धुक्यामुळे पंढरपूरचे झालं महाबळेश्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 07:59 IST2018-12-19T07:57:11+5:302018-12-19T07:59:28+5:30
पंढरपूर : मागील अनेक दिवसापासून जोरदार थंडीचा अनुभव घेत असलेल्या पंढरपुरकरांना बुधवारी घरबसल्या महाबळेश्वरच्या धुक्याची मजा चाखायला मिळतं आहे. ...

धुक्यामुळे पंढरपूरचे झालं महाबळेश्वर
पंढरपूर : मागील अनेक दिवसापासून जोरदार थंडीचा अनुभव घेत असलेल्या पंढरपुरकरांना बुधवारी घरबसल्या महाबळेश्वरच्या धुक्याची मजा चाखायला मिळतं आहे. सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा गारठा चांगलाच वाढला आहे
शनिवार, रविवार, सोमवार, या तीन दिवसापासून अधिकच थंडीचा गारठा वाढलाने दिवसाही थंडी वाजत आहे. बुधवारी पहाटे पासूनच शहरात धुके पडले. यामुळे शहरातील नागरिक महाबळेश्वर सारख्या वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. सकाळच्या आठ वाजल्या होत्या, तरी नागरिक वाहनांची लाईट लावून वाहने चालवत होते. रेल्वे मैदान, यमाई तुकाई तलाव, चंद्रभागा नदी आदी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.