शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना ‘सरस्वती सन्मान’  १८ वर्षांनी मराठीला मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 07:46 IST

ज्ञानपीठ पुरस्काराइतकाच तोलामोलाचा मानला जाणारा साहित्यातील ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे.

पुणे / सोलापूर  : ज्ञानपीठ पुरस्काराइतकाच तोलामोलाचा मानला जाणारा साहित्यातील ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर झाला आहे. ‘सनातन’ या कादंबरीसाठी लिंबाळे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विजय तेंडुलकर (१९९३) आणि महेश एलकुंचवार (२००२) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळणारे लिंबाळे हे तिसरे मराठी साहित्यिक ठरले आहेत. दिल्लीतील के के. बिर्ला फाऊंडेशनच्या वतीने कविता, कादंबरी, नाटक, हास्य-व्यंग, ललित लेखन, आत्मकथा, समीक्षा आदी प्रकारांतील भारतीय भाषांमधील उत्कृष्ट कलाकृतींसाठी साहित्यिकांना ‘सरस्वती सन्मान’ दरवर्षी प्रदान केला जातो. त्यासाठी लेखकाची कोणत्याही भाषेतील ही साहित्यकृती सन्मानाच्या दहा वर्षे आधीच्या कालावधीत प्रकाशित झालेली असावी, असा निकष ठेवण्यात आला आहे.डॉ. लिंबाळे यांची ‘सनातन’ ही कादंबरी मुघल आणि ब्रिटीश कालखंडातील इतिहासावर प्रकाश टाकते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात दलित आणि आदिवासींचे असलेले योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न लिंबाळे यांनी या कादंबरीतून केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावी जन्मलेल्या डॉ. लिंबाळे यांनी दलित साहित्याला वेगळा आयाम मिळवून दिला. त्यांचे ‘अक्करमाशी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. ‘अक्करमाशी’ची इंग्रजीसह विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांची आजवर ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  

जीवनवादी साहित्य देशातल्या एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळत आहे. एका जीवनवादी साहित्याचा हा गौरव आहे. भीमा-कोरेगाव लढ्याला दोनशे वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘सनातन’ कादंबरी लिहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित-आदिवासींनी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. मात्र इतिहासात त्यांच्या योगदानाचा कुठेही गौरव झालेला नाही. त्यामुळे मी ‘सनातन’ मधून नवा इतिहास उभा केला. - डॉ. शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ साहित्यिक

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूर