हुंडा घेतला.. पत्रिका वाटल्या..; लग्नापूर्वीच नवरोबा पळाल्याने गावभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 09:05 IST2022-04-16T09:03:13+5:302022-04-16T09:05:05+5:30

फिर्यादी यांची मुलगी व नामदेव जाधव यांचा मुलगा आकाश या दोघांचा लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी मुलीच्या घरी झाला

Dowry was taken .. Magazines were distributed .. Navroba ran away before marriage | हुंडा घेतला.. पत्रिका वाटल्या..; लग्नापूर्वीच नवरोबा पळाल्याने गावभर चर्चा

हुंडा घेतला.. पत्रिका वाटल्या..; लग्नापूर्वीच नवरोबा पळाल्याने गावभर चर्चा

सोलापूर/वैराग : दोन लाख ७५ हजार रुपये हुंडा घेऊन लग्नपत्रिकाही वाटल्या. नवरोबांनी ऐन लग्नाच्या तोंडावर पलायन केल्याची घटना तांबेवाडी, ता. बार्शी येथे घडली आहे. याप्रकरणी नवरा आकाश जाधव व त्याचे वडील नामदेव जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची मुलगी व नामदेव जाधव यांचा मुलगा आकाश या दोघांचा लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २१ फेब्रुवारी रोजी मुलीच्या घरी झाला. याप्रसंगी फिर्यादी चव्हाण यांनी नवदेव मुलगा आकाश यास एक तोळा वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या व त्याचे वडील नामदेव दगडू जाधव यांना दोन तोळ्याची सोन्याची चैन, असे एकूण अडीच लाख रुपयांचे पाच तोळे सोने व रोख २५ हजार रुपये असे दोन लाख ७५ हजार रुपये खर्च केला. त्या दोघांचा विवाह १५ एप्रिल रोजी आश्रमशाळा तांबेवाडी, ता. बार्शी येथे करण्याचे ठरले. त्यामुळे मुलीच्या वडिलांने लग्न पत्रिका छापून नातेवाइकांना कळविले. तत्पूर्वी नामदेव जाधव यांना मुलीच्या वडिलांनी लग्नाची तारीख जवळ आली आहे, असे सांगत तयारीबाबत विचारणा केली. तेव्हा नामदेव जाधव यांनी माझा मुलगा आकाश हा उस्मानाबाद येथे रूमवर राहत होता. तेथे तो नाही. तो कुठे गेला आहे, हे माहीत नाही, असे मुलीच्या वडिलांना सांगितले. तेव्हा मुलीच्या वडिलांनी लग्न कसे लावायचे, माझ्या मुलीचे कसे करू, मी माझ्या नातेवाइकांना गावातील लोकांना लग्नाचे कळविले आहे म्हटले. तेव्हा त्यांना तुमच्या मुलीचे काय करायचे ते करा हे लग्न होणार नाही, असे सांगितले. लग्न मोडून मुलीची व तिच्या कुटुंबाची बदनामी करून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सपोनि पराजने हे करत आहेत.

Web Title: Dowry was taken .. Magazines were distributed .. Navroba ran away before marriage