पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य मानू नका : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:28 IST2020-03-07T13:02:28+5:302020-03-07T13:28:38+5:30
दिल्लीमधील दंगल आरएसएस व भाजपाने घडविल्याचाही केला आंबेडकर यांनी आरोप

पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य मानू नका : प्रकाश आंबेडकर
पंढरपूर : दिल्लीमध्ये झालेली दंगल ही प्री प्लॅन असून ती दंगल आरएसएस व भाजपाने घडवली आहे. यामुळे पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य मानू नका असे सूचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
नाभिक समाजाच्या मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर हे पंढरपूर येथे आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माऊली हळनवर, तुकाराम चव्हाण, सतीश चव्हाण व अन्य उपस्थित होते.
पुढे आंबेडकर म्हणाले, दंगलीमध्ये सैनिकांचे गणवेश परिधान करून इतर लोक घुसलेले असल्याचे पोलिस व राजकीय नेते सांगतात. एका रिपोर्टनुसार २५ लाख सैनिकी गणवेश कोणीतरी विकत घेतले आहेत. याची माहिती सरकारने काढणे गरजेचे आहे. या सर्व घटनेवरून पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य वाटणार नाही असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.