तुम्हाला सोलापूर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र हवं आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा 

By Appasaheb.patil | Published: October 3, 2022 03:36 PM2022-10-03T15:36:25+5:302022-10-03T15:36:38+5:30

ऑनलाइन अर्ज करण्यास प्रारंभ झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

Do you want degree certificate of Solapur University? Then read this news for sure | तुम्हाला सोलापूर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र हवं आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा 

तुम्हाला सोलापूर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र हवं आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा 

googlenewsNext

सोलापूर :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अठराव्या दीक्षांत समारंभाची तयारी सुरू झाली असून यामध्ये पदवी-पदविका प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास प्रारंभ झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

कुलपती कार्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे. या समारंभात पदवी प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. 2017 ते 2021 यादरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहे. मे 2005 ते डिसेंबर 2016 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे लागणार आहे. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाचा ऑनलाइन भरलेल्या अर्जाची साक्षांकित प्रत 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत विद्यापीठात जमा करावे लागणार आहे. 

su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर student login करून convocation या लिंकवर पदवी प्रमाणपत्रसाठी अर्ज उपलब्ध आहे. दीक्षांत समारंभाची तारीख व वेळ नंतर जाहीर केली जाणार आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ईमेलद्वारे आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दीक्षांत समारंभ पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना आधार क्रमांकावरून पदवीप्रमाणपत्राची ई प्रत संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे. फॉर्म भरताना काही अडचण आल्यास convocation@sus.ac.in या इमेल वर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------
पदवी प्रमाणपत्राचे शुल्क भरल्यास अर्ज करू नये
ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी पदवी प्रमाणपत्राचे शुल्क अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना अदा केले आहे, अशा विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य असल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Do you want degree certificate of Solapur University? Then read this news for sure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.