भाजपामुळे आली पाळी...विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 11:59 IST2018-11-07T11:56:56+5:302018-11-07T11:59:44+5:30

सोलापूर : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून विद्यार्थी व जनतेविरोधी धोरणामुळे सर्वांचे हाल होत आहे़ या दिवाळीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ...

Diwali ... due to BJP ... | भाजपामुळे आली पाळी...विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी...!

भाजपामुळे आली पाळी...विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी...!

ठळक मुद्दे- काँग्रेसने केला भाजप सरकारचा निषेध- पंतप्रधानांच्या विरोधात  घोषणाबाजी- आंदोलनावेळी पोलीसाचा बंदोबस्त

सोलापूर : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून विद्यार्थी व जनतेविरोधी धोरणामुळे सर्वांचे हाल होत आहे़ या दिवाळीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी व सर्वसाधारण जनता यांच्यावर काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रसंग ओढावविलेला आहे़ याचा निषेध म्हणून काँग्रेस एऩ एस़ यु़ आय विद्यार्थी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले.

भाजप सरकारने युवकांना दिल्या गेलेल्या अच्छे दिनाचे स्वप्न, दोन कोटी युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, १५ ालख रूपये बँक खात्यावर जमा करणार अशा विविध फसव्या घोषणा करून जनतेला स्वप्ने दाखवून सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थी व जनतेवर काळी दिवाळी करण्याचा प्रसंग या दिवाळीत आला आहे म्हणून काँग्रेसचे एऩ एस़  यु़ आयचे गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी तिरूपती परीकपंडला, शुभम माने, मनोज आदटराव, संदेश कांबळे, शिवराज बिराजदार, अनंत म्हेत्रे, रजनीकांत जाधव, अमित पवार, चेतन यादव, निवृत्ती गव्हाणे, श्रीकांत वाडेकर, अमर भोसले, निलेश पाटील, युवराज दोडमनी, सागर भिसे, विकी आलाट, अरबाज शेख, सुरज होमकर, गौरव बनसोडे, दिनेश डोंगरे, चेतन जाधव आदी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते़

 

Web Title: Diwali ... due to BJP ...