जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा

By Admin | Updated: May 6, 2014 01:23 IST2014-05-05T22:19:03+5:302014-05-06T01:23:08+5:30

सोलापूर : लोकसभा निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) वाटपाच्या जबाबदारीत टाळाटाळ करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कनिष्ठ सहायक एम. एस. सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

District Par. Crime against deputy chief executive officer | जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा

जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा

सोलापूर : लोकसभा निवडणूक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) वाटपाच्या जबाबदारीत टाळाटाळ करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे कनिष्ठ सहायक एम. एस. सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
धर्मराज पटणे (रा. खासबाग हसापूर, अक्कलकोट) यांनी याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. १७ मार्च ते २५ एप्रिलदरम्यान रामवाडी येथील ग्रीन गोडावून येथील स्ट्राँगरूममधून ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघनिहाय लावून घेण्याची जबाबदारी जाधव व सुतार यांच्यावर देण्यात आली होती. पण त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यात कुचराई केली. याबाबत त्यांना वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना केल्या, पण त्यांनी सूचनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्यामुळे कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी कसूर केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले. तपास सपोनि पाटील करीत आहेत.

Web Title: District Par. Crime against deputy chief executive officer