राष्ट्रवादी कामगार सेलतर्फे सर्वरोगनिदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:41 IST2020-12-05T04:41:58+5:302020-12-05T04:41:58+5:30

सोलापूर : राष्ट्रवादी कामगार सेलतर्फे २ ते १५ डिसेंबरदरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सेलचे अध्यक्ष डॉ. ...

Diagnosis camp by Nationalist Workers Cell | राष्ट्रवादी कामगार सेलतर्फे सर्वरोगनिदान शिबिर

राष्ट्रवादी कामगार सेलतर्फे सर्वरोगनिदान शिबिर

सोलापूर : राष्ट्रवादी कामगार सेलतर्फे २ ते १५ डिसेंबरदरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सेलचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

सेलच्या वतीने पुढील आठवडाभर गरीब महिलांना साडीवाटप, दंत तपासणी शिबिर, नेत्रतपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटप, अन्नदान आदी कार्यक्रम होतील. या शिबिरात डॉ. निखिलेश मठ, डॉ. एम. आर. बंडी यांनी औषधोपचार केले. यावेळी सतीश दासरी, बालाजी बुधारम, विष्णू गुंडेटी, सतीश गोरंटला, अंबादास देवीदास, तिम्मप्पा मादगुंडी, दामोदर येलदी आदी उपस्थित होते.

Web Title: Diagnosis camp by Nationalist Workers Cell