ढोंबळेंनी ओलांडली लक्ष्मणरेषा, हाती घेतलं कमळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:41 IST2019-01-28T14:38:36+5:302019-01-28T14:41:29+5:30

सोलापूर : राष्ट्रवादीचे माजीमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर सोमवारी जालना येथील भाजपाच्या कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ...

Dhondabeni crossed the loinspace, the lily in hand | ढोंबळेंनी ओलांडली लक्ष्मणरेषा, हाती घेतलं कमळ

ढोंबळेंनी ओलांडली लक्ष्मणरेषा, हाती घेतलं कमळ

ठळक मुद्दे- लक्ष्मणराव ढोबळे हे राष्ट्रवादीचे माजीमंत्री तथा शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते- मागील काही दिवसांपासूनच ढोंबळे भाजपात प्रवेश करणार याची होती चर्चा सुरू- सोलापूर जिल्ह्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केले ढोंबळेचे स्वागत

सोलापूर : राष्ट्रवादीचे माजीमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर सोमवारी जालना येथील भाजपाच्या कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.

सोमवारी जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीची कार्यकारणी बैठक होती़ या बैठकीदरम्यान माजीमंत्री ढोबळे यांनी भाजपात प्रवेश केला़ याचवेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ढोंबळे याचे पक्षात स्वागत केले़ यावेळी  जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, टेंभुर्णीचे संजय कोकाटे आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून ढोबळे हे भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत होते़ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सोलापूर दौºयावेळी ढोंबळेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता़ माझ्या उपस्थितीतच प्रवेश करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते़ अखेर सोमवारी ढोबळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

 

Web Title: Dhondabeni crossed the loinspace, the lily in hand