Dhawalsinh Mohite - Patil to join Congress tomorrow; Party entry to be held in Mumbai | धवलसिंह मोहिते - पाटील यांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश; मुंबईत होणार पक्षप्रवेश

धवलसिंह मोहिते - पाटील यांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश; मुंबईत होणार पक्षप्रवेश

पंढरपूर :  दिवंगत माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवीन रंगत येणार आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील यांनी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील महत्त्वांच्या तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. तसेच त्यांनी शिवसेनेतही काम केले होते.


सध्या काँग्रेसकडे ग्रामीण भागाशी निगडित असलेला चेहरा नव्हता. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर राजकारणाची गणिते बदलणार आहेत.

त्याचबरोबर आशिया खंडात मोठी म्हणून सन्मानित असलेले अकलुज ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत चुलते विजयसिंह मोहिते-पाटील यांना धवलसिह मोहिते - पाटील यांनी चांगली  टक्कर दिली होती. यामुळे यापुढे ही काका - पुतणे लढाई बघायला मिळणार आहे.

धवलसिह मोहिते - पाटील हे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्ष तथा महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत  मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवन येथे गुरुवारी दुपारी ३ वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे बडे नेतेही उपस्थितीत रहाणार आहेत. डॉ. धवलसिंह मोहिते पाटीलांच्या काँग्रेस प्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकत वाढणार आहे.

-------------------------------
काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. पद घेण्याबाबत संदर्भात चर्चा झालेली नाही.

- डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील

Web Title: Dhawalsinh Mohite - Patil to join Congress tomorrow; Party entry to be held in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.