शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांनी रात्र जागून काढली

By admin | Updated: July 8, 2014 23:58 IST

अपुरा निवारा; पावसाची हजेरी, चंद्रभागा बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप

 पंढरपूर: पंढरपूर शहर व वाखरी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या धो-धो पावसाचा पालखीतील वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. वाखरी पालखी तळावर अपुऱ्या निवाऱ्याच्या सोयीमुळे त्यांना रात्र पाणी, चिखलात जागून काढावी लागली तर खास आषाढीसाठी सोय करण्यात आलेल्या चंद्रभागा बसस्थानकाच्या मैदानावर तळे साचल्याने वारकऱ्यांना चिखल, पाणी याचा सामना करीत बस धरावी लागली.दीड महिन्यापासून वरूणराजाने पंढरपूर तालुक्यावर अवकृपा दाखवली होती; मात्र रविवारी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या प्रमुख संतांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश करताच रविवारी व सोमवारी सायंकाळी सलग दोन दिवस पंढरपूर, वाखरी, भंडीशेगावसह पालखी मार्गावर दमदार हजेरी लावली आहे. यामुळे आषाढी यात्रा सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडत आहे. सोमवारी दुपारी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे बाजीराव विहीर येथे उभे व गोल रिंगण पार पडल्यानंतर सर्व संतांच्या पालख्यांनी मुक्कामासाठी वाखरी गाठली; मात्र त्या ठिकाणी वारकऱ्यांनी पावसाचे जल्लोष करीत स्वागतच केले. वाखरी पालखी तळावर पालख्यांचे ठिकठिकाणी तंबू मारण्यात आले होते; मात्र त्यामध्ये महिला भाविकांना कसाबसा आश्रय मिळाला. या ठिकाणी तंबू व्यतिरिक्त कोणतीही निवाऱ्याची सोय नसल्याने अनेक भाविकांना मेनकापड, प्लास्टिकचे कागद वापरून उभी रात्र जागून काढावी लागली.वाखरीत सर्व संतांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो. त्यामुळे महिनाभर पंढरीच्या दिशेने चालणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह असतो. या ठिकाणी रात्रभर भजन, कीर्तन, भारूड व अन्य पारंपरिक खेळ सुरू असतात; मात्र सोमवारी रात्री आठच्या सुमारास झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत चालू होता. पावसामुळे पालखी तळांवर ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने भजन, कीर्तन करणे भाविकांना शक्य नव्हते. त्यामुळे भाविकांच्या उत्साहावर पाऊस पडल्याने त्याचा भजन, कीर्तनावर मोठा परिणाम झाला.----------------------------------------बसस्थानकावर पाणीयात्रा कालावधीत मुख्य बसस्थानकावर प्रवासी व वाहतुकीचा ताण येऊ नये, म्हणून चंद्रभागा मैदानावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे; मात्र सोमवारी झालेल्या धो-धो पावसामुळे या बसस्थानकाच्या सखल भागात पाणी साठून तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामध्ये बसची ये-जा सुरू असल्याने चिखल होऊन ठिकठिकाणी चिखलही झाला होता. त्याचा फटका भाविकांना बसला.---------------------------------------निवाऱ्याची सोय करावीप्रत्येक वर्षी यात्रा कालावधीत पाऊस आला की त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी राज्य शासनाने भक्त निवासाच्या धर्तीवर वाखरी, चंद्रभागा वाळवंटात धर्मशाळा बांधून त्यामध्ये भाविकांची सोय करण्याची मागणी भाविकांतून जोर धरत आहे. -------------------------------शहरातही भाविक उघड्यावरसर्व संतांच्या पालख्यांचा मुक्काम जरी वाखरीत असला तरी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात, वाळवंटात वास्तव्य करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या सर्व उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या भाविकांना या पावसामुळे उभी रात्र जागून काढावी लागली. काहींनी धोके पत्करून वाहनाखाली, झाडाखाली निवारा शोधण्याचा प्रयत्न केला.