महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार; एकनाथ खडसे यांचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 14:26 IST2020-01-21T14:20:07+5:302020-01-21T14:26:33+5:30

एकनाथ खडसे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; सांगोला तालुक्यातील कोळा येथे घेणार जाहीर सभा

The development-led government will last five years; Prophecy of Eknath Khadse | महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार; एकनाथ खडसे यांचे भाकीत

महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार; एकनाथ खडसे यांचे भाकीत

ठळक मुद्देमाजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आज सोलापूर जिल्हा दौर्‍यावरसांगोला तालुक्यातील कोळा येथे घेणार जाहीर सभा

पंढरपूर : सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे विचार सोडून शिवसेनाकाँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकणार असल्याचे  एकनाथ खडसे यांनी सांगितले.

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पंढरपूर मध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे खडसे म्हणाले, प्रत्येक पक्षाचे धोरण वगळे असते. यामध्ये शिवसेना हिंदूत्व तर काँग्रेस पुरागामी असे असतानाही ते एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. त्यांना ५० दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या ५० दिवसांच्या कालावधीत त्यांनी एकमेकांवर अनेक टीका केली आहेत. त्यांची सरकार चालवण्यासाठी तीन पायाची शर्यत सुरू आहे. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी  पक्षाचे विचार सोडून एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात.  यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकते असे एकनाथ खडसे यांनी सांगितले

Web Title: The development-led government will last five years; Prophecy of Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.