दीराने केला भावजयीचा विनयभंग

By Admin | Updated: May 21, 2014 01:24 IST2014-05-21T01:24:45+5:302014-05-21T01:24:45+5:30

सांगोला : वाईट हेतूने लज्जा वाटेल असे कृत्य करीत भावजयीचा दीराने विनयभंग केल्याची घटना निजामपूर (ता. सांगोला) येथे घडली.

Derea's brother bribe molestation | दीराने केला भावजयीचा विनयभंग

दीराने केला भावजयीचा विनयभंग

सांगोला : वाईट हेतूने लज्जा वाटेल असे कृत्य करीत भावजयीचा दीराने विनयभंग केल्याची घटना निजामपूर (ता. सांगोला) येथे घडली. पीडित भावजयीने तक्रार दिल्याने पोलिसांनी दीराला अटक केली आहे. ब्रह्मदेव संदीपान लवटे असे त्याचे नाव आहे. निजामपूर येथील पीडित महिला रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरासमोरील अंगण साफसफाई करीत असताना दीराने भावजयीला हाक मारुन बोलावून घेतले. यावेळी भावजयीने दीराला काय काम आहे असे विचारले असता वाईट हेतूने हातवार्‍याचे इशारे केले. यावेळी पीडित महिलेने आरडाओरडा करताच दीराने धूम ठोकली.पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार किशोर पानगावकर करीत आहेत. 

Web Title: Derea's brother bribe molestation