बिबट्याला पकडण्यासाठी सरकारकडे हेलिकॉफ्टरची मागणी; रणजितसिंह नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 02:47 PM2020-12-09T14:47:31+5:302020-12-09T14:48:00+5:30

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न; त्या बिबट्याला आतापर्यंत घेतले तीन बळी

Demand for helicopters from the government to catch leopards; Ranjit Singh Naik-Nimbalkar | बिबट्याला पकडण्यासाठी सरकारकडे हेलिकॉफ्टरची मागणी; रणजितसिंह नाईक-निंबाळकर

बिबट्याला पकडण्यासाठी सरकारकडे हेलिकॉफ्टरची मागणी; रणजितसिंह नाईक-निंबाळकर

Next

सोलापूर - बिबट्याला पकडण्यासाठी शासनाने हवाई सर्वेक्षण करावे, हेलिकॉफ्टर द्यावे. आपणाकडून या गोष्टी उपलब्ध होत नसतील तर आम्ही वनखात्याला हेलिकॉफ्टर देऊ, त्यासाठी लागणारी परवानगी मात्र शासनाने द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. 

पुढे बोलताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले की, करमाळा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने चांगलेच थैमान घातले आहे. त्याने आतापर्यंत करमाळ्यातील तीन जणांचा बळी घेतलेला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे. करमाळा तालुक्यातील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, अन्यथा घराबाहेर पडू नये असेही आवाहन निंबाळकर यांनी केले. 

Web Title: Demand for helicopters from the government to catch leopards; Ranjit Singh Naik-Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.