करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 03:45 PM2020-04-26T15:45:44+5:302020-04-26T15:47:15+5:30

कोरोना संकटातही गूड न्यूज; रोज ५०० टन केळीची निर्यात, भाव मिळू लागला

Demand for bananas in Karmala Anmadha taluka in North India | करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी

करमाळा अन् माढा तालुक्यातील केळीला उत्तर भारतात मागणी

Next
ठळक मुद्देआंध्रप्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाठवली जातेआंध्रप्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना सध्या उजनी परिसरात निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. ती चवीला चांगली

नासीर कबीर  

करमाळा : केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली सुधारणा झाली असून, करमाळा तालुक्यातील  दर्जेदार केळीला उत्तर भारतातून चांगला उठाव आहे. सध्या केळी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर  येथे मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहे.  यामुळे केळी बागायतदारांच्या चेहºयावर हसू फुुललं आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे  बाजारपेठा बंद होत्या. ग्राहक नव्हते शिवाय जिल्हा बंदीची सक्त अंमलबजावणीमुळे केळीची पाठवणूक  रखडली होती. यामुळे दरात घसरण झाल्याने केळी उत्पादक संकटात सापडला होता. २० एप्रिलपासून शेतीमालास लॉकडाऊनमधून सवलत मिळाल्याने केळीची पाठवणूक सुरू झाली आहे. टेंभुर्णी, कंदर, वाशिंबे, उमरड, शेटफळ, चिकलठाण, वांगी  भागातून सध्या रोज ५० ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता)  म्हणजे दररोज ५००  टन केळीची उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर येथे पाठवली जात आहे. केळीचे दर मागील आठवड्यात ४ ते ५ रुपये किलो होते, परंतु आज २५ तारखेपासून रमजान सुरू झाल्याने उत्तरेकडून केळीची मोठी मागणी सुरू झाली आहे. परिणामी दरात सुधारणा झाली असून, ७ ते ८ रुपये किलो दर शिवार खरेदीत मिळत आहेत. यामुळे केळी उत्पादकातून उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

आंध्रातला हंगाम संपला.. सोलापूर जिल्ह्याला संधी
आंध्रप्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. आंध्रप्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना होत आहे. सध्या उजनी परिसरात निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे. ती चवीला चांगली असल्याने त्यास मागणी आहे, अशी माहिती फलटणचे खरेदीदार सनी इंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितली.

Web Title: Demand for bananas in Karmala Anmadha taluka in North India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.