सोलापुरात पाण्याची टंचाई; टँकर आल्यास सोलापूरकरांना करावी लागतेय धावपळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:52 AM2019-03-30T10:52:37+5:302019-03-30T10:55:25+5:30

टंचाईच्या झळा : हद्दवाढ भागात तीव्रता अधिक, टँकरच्या खेपा वाढल्या, आज आलेला टँकर आता पाच दिवसांनीच गल्लीत येतो आणि २० मिनिटात रिकामा होतो

Deep shortage of water in Solapur; Solarpunkers have to make a move if tankers come! | सोलापुरात पाण्याची टंचाई; टँकर आल्यास सोलापूरकरांना करावी लागतेय धावपळ !

सोलापुरात पाण्याची टंचाई; टँकर आल्यास सोलापूरकरांना करावी लागतेय धावपळ !

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्यासाठी सोसावी लागणार आणखी आठ दिवस कळशहराच्या सर्व भागात पाच दिवसाआड व्यवस्थित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरूऔज बंधारा आणि उजनी ते सोलापूर हे शहराच्या पाणीपुरवठ्याचे दोन महत्त्वाचे स्रोत

सोलापूर : उजनीतून सोडलेले पाणी दोन एप्रिलला औज बंधाºयात पोहोचणार आहे. उजनीतून भीमा नदीत विसर्ग सुरू असल्याने उजनी पंप हाऊसमधील उपशावर परिणाम झाला आहे. टाकळी, सोरेगाव आणि उजनी पंप हाऊसमधून पाणीपुरवठा सुरळीत व्हायला आणखी आठ दिवस लागतील. तोपर्यंत शहरवासीयांनी कळ सोसावी. पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. 

औज बंधारा आणि उजनी ते सोलापूर हे शहराच्या पाणीपुरवठ्याचे दोन महत्त्वाचे स्रोत आहेत. औज बंधाºयातील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरविणे अपेक्षित होते, परंतु कर्नाटक हद्दीतील शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला. त्यावर जलसंपदा विभाग नियंत्रण ठेवू शकला नाही. त्यामुळे १५ मार्चच्या दरम्यान औज बंधारा कोरडा पडला. उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास विलंब झाला. प्रशासकीय पातळीवर त्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. उजनीतून २३ मार्चला सोडलेले पाणी दोन एप्रिलच्या रात्री पोहोचेल, असा अंदाज जलसंपदा विभागातील अधिकाºयांना आहे. औज बंधारा भरल्यानंतर हे पाणी टाकळी जॅकवेलमध्ये घेतले जाईल. यंदा उजनी धरण १०० टक्के भरले होते. उपलब्ध पाण्याचे व्यवस्थित नियोजन न झाल्याने शहरावर पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे. 

शहरातील टंचाईमुळे गावठाण भागात काही ठिकाणी आणि हद्दवाढ भागात टँकरवर विसंबून राहावे लागत असून, गुरुवार, २१ मार्च ते गुरुवार २८ मार्च या काळात या सप्ताहभरात टँकरच्या १३ खेपा वाढल्याचे निदर्शनास आले़ जुळे सोलापूर येथील झोन पाच आणि सहामध्ये टँकरच्या ५ खेपा तर रुपाभवानी येथील झोन ३ मधून टँकरच्या सात खेपा वाढल्या आहेत़ तसेच गुुरुनानक चौकातील झोन चारमधून टँकरची एक खेप वाढलेली निदर्शनास आली.

आकाशवाणीपासून काही अंतरावर असलेल्या आरती नगरमध्ये दुपारी १२़ ४० वाजता हा टँकर पोहोचला़ सहा दिवसांनी टँकर आल्याचे दिसताच स्थानिक रहिवाशांच्या चेहºयावरील भाव टिपण्यासारखे होते़ टँकर थांबताच एकच गलका झाला़ पाणी भरण्यासाठी लांबलचक रांग लागली़ मोठे पाईप जोडून जागेवरच प्लास्टिक बॅरलमध्ये पाणी भरुन ठेवण्यात नागरिक भान हरपून गेले़ या बॅरलमधील पाणी पुन्हा घरामधील भांड्यात भरण्यासाठी धावपळ सुरु झाली.

हद्दवाढ भाग होऊन आज २५ वर्षे ओलांडल्यानंतरही या नगरात पाण्याची पाईपलाईन पोहोचलेली नाही़ मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर हे नगर आत असून पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवते़ मोलमजुरी आणि गरीब कामगारांची घरे असून काही पत्र्याची तर काही बºयापैकी घरे दिसतात. मतदारांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात असताना ऐन उन्हाळ्यात या भागाला पाण्याची झळ सर्वाधिक बसत आहे.

टाकळी पंपगृहातील आणखी एक पंप बंद

- सोलापूर शहराला उजनी ते पाकणी जलवाहिनीतून ५५ ते ६० एमएलडी पाणीपुरवठा होतो. टाकळी ते सोरेगाव येथील पंपगृहातून ७० एमएलडी पाणीपुरवठा होतो. टाकळी जॅकवेलमध्ये शुक्रवारी एक फूट दोन इंच पाणी आहे. येथील चार पंपापैकी एक पंप गुरुवारी बंद करण्यात आला. शनिवारी आणखी एक पंप बंद होईल. त्यामुळे जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीमध्ये पाणी कमी दाबाने पोहोचणार आहे. उजनी धरण परिसरात महापालिकेचा एक पंपगृह आहे. या पंपगृहातून पाकणी पंपगृहात पाणी पोहोचते. सध्या धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे या पंपगृहातील उपशावर परिणाम होत आहे. पाकणीमध्ये कमी दाबाने पाणी पोहोचत आहे. या परिस्थितीत शहराच्या सर्व भागात पाच दिवसाआड व्यवस्थित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले. 

२० मिनिटात टँकर रिकामा 
- टँकर येताच साºयांचा एकच गलका़़़मला लावू द्या घागर, मला लावू द्या घागऱ पाहता पाहता पाच हजार लिटरचा टँकर अवघ्या २० मिनिटात रिकामा झाला़ या भागात रस्ते चांगल्या स्थितीत नसल्याने टँकर पोहोचायला वेळ लागला़ अशाचपद्धतीने बाजूच्या व्यंकटेश्वर नगर, कामाक्षी नगर, परमेश्वर नगर, बालाजी नगर आणि करली नगरला पाणीपुरवठा सुरु आहे. आज आलेला टँकर आता पाच दिवसांनीच गल्लीत येतो आणि २० मिनिटात रिकामा होतो. 

Web Title: Deep shortage of water in Solapur; Solarpunkers have to make a move if tankers come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.