पंढरपूर : कर्नाटकहून पायी दिंडीने आलेल्या एका नऊ वर्षांच्या चिमुरड्या भाविकाचा इमारतीच्या छतावरून कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी पंढरीतील इंदिरा भाजी मार्केटजवळ ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्याला दवाखान्यात पोहोचविले पण तत्पूर्वी त्याचा प्राण गेला होता.दिंडीतील शिवा मऱ्याप्पा (वय ९ , रा. बद्दारी, जि. बेल्लारी, कर्नाटक) हा मुलगा इमारतीच्या छतावर खेळत असताना ४० फूट उंचीवरून पडला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}