शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

धाकटा राजवाड्यात एकाचा मृत्यू

By admin | Updated: July 3, 2014 01:23 IST

तरुण होरपळला : शॉर्टसर्किटने घरही पेटले

सोलापूर : कोंतम चौकातील धाकटा राजवाड्यात शॉर्टसर्किटने घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर घरात बसलेला यल्लप्पा आप्पा गायकवाड (वय ३०) हा होरपळून मरण पावला. आज (बुधवारी) सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला. यल्लप्पा आप्पा गायकवाड हा सकाळी साडेदहा वाजता जेवण करीत बसला होता. त्यावेळी त्याची आई घराबाहेर बसली होती तर भाऊ मासळी विकण्यासाठी बाहेर गेला होता. स. १०.३० ते ११ च्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आगीच्या ठिणग्या पडू लागल्या. म्हणता म्हणता आग पसरली. यल्लप्पाला काय करावे सुचेना. त्याला घराबाहेर पडता न आल्याने तो पूर्णत: भाजला गेला. घटनेचे वृत्त समजताच जोडभावीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हवालदार राठोड यांनी तातडीने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आग विझविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आग भडकली होती. या आगीत घरातील पलंग, कपडे, धान्य, दूरदर्शन संच आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.