शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पोलिसाने केली क्रेन चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 13:36 IST

सोलापूर शहर मुख्यालयातील पोलीस कर्मचाºयाविरूध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्देन्यायालयासमोरील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील नो पार्किंग झोनसमोरील मोटरसायकल का उचलली असा जाब विचारत, वाहतूक शाखेच्या क्रेन चालकाला मारहाण केलीया प्रकरणी मुख्यालयातील पोलीस कर्मचाºयाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

सोलापूर : न्यायालयासमोरील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील नो पार्किंग झोनसमोरील मोटरसायकल का उचलली असा जाब विचारत, वाहतूक शाखेच्या क्रेन चालकाला मारहाण केली. या प्रकरणी मुख्यालयातील पोलीस कर्मचाºयाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी १२.३0 वाजण्याच्या सुमारास घडला. 

रविकिरण कोडपाक (नेमणूक पोलीस मुख्यालय) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे. कोडपाक याने न्यायालयासमोरील नो पार्किंग झोनमध्ये स्वत:ची मोटरसायकल लावली होती. चालक सुरेश शिंदे (वय ५७, रा. हौसेवस्ती, आमराई) हा वाहतूक शाखेची क्रेन (क्र. एमएच-१३ आर-0७२२) घेऊन आला. क्रेनवरील कर्मचाºयांनी कोडपाक याची मोटरसायकल उचलून पाठीमागे ठेवली. हा प्रकार लक्षात येताच जवळच असलेला रविकिरण कोडपाक क्रेन जवळ आला, त्याने माझी गाडी का उचलली असा जाब विचारत सुरेश शिंदे यांच्या थोबाडीत मारली. हा प्रकार पाहून क्रेनमध्ये बसलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद लक्ष्मण लोखंडे (नेमणूक वाहतूक शाखा दक्षिण ) हे खाली उतरले. 

कोडपाक याला बाजूला करण्याचा प्रयत्न करीत असताना तो मिलिंद लोखंडे यांच्यावर मारण्यासाठी धावून गेला. गणवेशासह गच्ची पकडून ढकलून दिले. रस्त्यावरील दगड क्रेनच्या दिशेने भिरकावला. क्रेनमधील कर्मचाºयांनी उडी मारून दगड चुकवण्याचा प्रयत्न केला. कोडपाक रस्त्याच्या कडेला पडलेली लाकडी पट्टी घेऊन सुरेश शिंदे यांना मारण्यासाठी धावला. हा प्रकार पाहून सर्वजण क्रेनमध्ये बसून रंगभवनच्या दिशेने जात होते. कोडपाक रिक्षातून क्रेनचा पाठलाग करू लागला. रिक्षातून उडी मारून कोडपाक याने पुन्हा सुरेश शिंदे याला मारण्याचा प्रयत्न करू लागला. चालकाने वेग वाढवून क्रेन वाहतूक शाखा कार्यालयाजवळ नेली. कोडपाक वाहतूक शाखेच्या डंपिंग ग्राऊड येथे येऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरसट व काळे  यांच्याशी हुज्जत घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. स्वत:ची गाडी घेऊन निघून गेला. पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. 

वॉकीटॉकीवरून नियंत्रण कक्षाला दिली माहिती...- शहर वाहतूक शाखेच्या वतीने दररोज नो पार्किंगच्या गाड्यांवर कारवाई केली जाते. सोमवारी साध्या वेशात असलेल्या पोलिसांकडून क्रेन चालकावर होत असलेली मारहाण व गोंधळ पाहून लोक आचंबित झाले. मारहाणीत मिलिंद लोखंडे यांच्या तळहाताला मार लागला. पोलीस कर्मचारी रविकिरण कोडपाक याचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद लोखंडे यांनी वॉकीटॉकीवरून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी