खून करुन बोअरवेलमध्ये टाकले तुकडे, जवळच आढळली माळव्याची पिशवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 21:00 IST2018-08-19T21:00:01+5:302018-08-19T21:00:42+5:30
मंगळवेढा तालुक्यात अज्ञाताचा खून करून त्याचे तुकडे बोअरवेलमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोणेवाडी, जुनोनी आणि खुपसंगी या तीन गावच्या शिवेवर ही घटना घडली. शनिवारी रात्री उशिरा
_201707279.jpg)
खून करुन बोअरवेलमध्ये टाकले तुकडे, जवळच आढळली माळव्याची पिशवी
सोलापुर : मंगळवेढा तालुक्यात अज्ञाताचा खून करून त्याचे तुकडे बोअरवेलमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोणेवाडी, जुनोनी आणि खुपसंगी या तीन गावच्या शिवेवर ही घटना घडली. शनिवारी रात्री उशिरा घटनी घडली, पण रविवारी दुपारी समोर आल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली असून गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
घटनास्थळी चुना डबी, चप्पल आदी पडल्या आहेत. पोलिसांना रविवारी दुपारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. शरीराचे लहान-लहान तुकडे बोअरवेलमध्ये टाकले असल्याने ते बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. अद्याप मृताचे नाव समजले नसून खून कुणी आणि कशासाठी केला याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे व पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हे पोलीस पथकासह दाखल असून मृतदेह पुरूष जातीचा असून शेजारी काल नंदेश्वरहून बाजार करून नेलेली माळव्याची पिशवी व काळी पॅरागोन चप्पल आहे. याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि मृत व्यक्ती कोण याचा पोलीस तपास सुरू जलद तपासाच्या दृष्टीने श्वानपथक पाचारण केले असल्याचे समजते.