धक्कादायक! खासगी घरात स्वामीभक्त म्हणून उतरले, तरुणाने तरुणीवर वार करून केली हत्या; आरोपी स्वतःही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:10 IST2026-01-05T19:08:57+5:302026-01-05T19:10:11+5:30
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंधातून तरुणीची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस येताच तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

धक्कादायक! खासगी घरात स्वामीभक्त म्हणून उतरले, तरुणाने तरुणीवर वार करून केली हत्या; आरोपी स्वतःही जखमी
अक्कलकोट : येथील हद्दवाढ भागात बासलेगाव रोडवर एका खासगी घरात एका दिवसासाठी स्वामीभक्त म्हणून भाड्याने रूम घेऊन राहिलेल्या प्रियकराने प्रेयसीचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर स्वतःसुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही दुर्दैवी घटना ४ जानेवारी रोजी १०:३० ते पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय २०, रा. पोगुलमाळा, रामवाडी, सोलापूर) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव असून प्रियकर आरोपी आदित्य रमेश चव्हाण (वय २२, रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रेमसंबंधातून तरुणीची निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस येताच तत्काळ पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
तीक्ष्ण हत्याराने वार
आरोपीने तीक्ष्ण हत्याराने स्नेहा हिच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही तीक्ष्ण हत्याराने वार करून घेत स्वतःला जखमी केल्याचे तपासात पुढे आले आहे. १०३ (१) सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम ३ (२) (व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय २०, रा. रामवाडी, पोगुलमाळा, सोलापूर) आणि आदित्य रमेश चव्हाण (रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) यांच्यात प्रेमसंबंध होते. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० ते ११:४५ या वेळेत बासलेगाव रोड येथील लोखंडे मंगल
कार्यालयाच्या पाठीमागे पिरजादे प्लॉटमधील कोळी यांच्या घरात ही घटना घडली.
या प्रकरणी लक्ष्मी श्रीकांत बनसोडे (वय ४०, रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास पोलिस निरीक्षक दीपक भिताडे हे प्रभारी अधिकारी करीत आहेत.