क्राइम; लग्न समारंभात गर्दी केली; वधूपित्यावर  साेलापुरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 11:56 IST2022-02-11T11:55:57+5:302022-02-11T11:56:03+5:30

सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

Crime; Crowded the wedding ceremony; Crime filed against bridegroom in Salelapur | क्राइम; लग्न समारंभात गर्दी केली; वधूपित्यावर  साेलापुरात गुन्हा दाखल

क्राइम; लग्न समारंभात गर्दी केली; वधूपित्यावर  साेलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर : कोरोनाच्या परिस्थितीमुळे गर्दी जमवण्याबाबत विविध निर्बंध घालण्यात आले आहेत; पण तरीही निर्बंध धुडकावत विवाह कार्याचे आयोजन करून बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी वधूपित्यावर बसवराज रामस्वामी मनलोंर ( रा. कोनापुरे चाळ) याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस नाईक बाळू जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

कोनापुरे चाळ परिसरातील परिहार अपार्टमेंट जवळ बसवराज रामस्वामी मनलोंर यांनी कोणतीही परवानगी न घेता विवाहाचे आयोजन केले. तसेच विनापरवाना रस्त्यावर मंडप टाकून बेकायदेशीर जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सूर्यकांत जाधव यांनी फिर्याद दिली असून बसवराज मनलोंर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस नाईक जयसिंग भोई हे करत आहेत.

 

Web Title: Crime; Crowded the wedding ceremony; Crime filed against bridegroom in Salelapur