शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर; सोलापुरात १८ ठिकाणी होणार लसीकरण बुथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 2:46 PM

३८ हजार कर्मचारी: दिवसाला होणार १८०० लसीकरण

सोलापूर : आरोग्य विभागाच्या पोर्टलवर नोंद झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात १८ लसीकरण बुथ निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी लोकमत शी बोलताना दिली.

केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे आता राज्य सरकारही निर्णय घेणार आहे. या धर्तीवर जिल्हा आरोग्य विभागाने लसीकरणाची रंगीत तालीम घेतली. ही चाचणी यशस्वी झाली व ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. लसीकरणासाठी जिल्ह्यातील ३८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यातील १८ हजार कर्मचारी ग्रामीण व नगरपालिका हद्दीतील आहेत तर उर्वरित २० हजार कर्मचारी सोलापूर महापालिका क्षेत्रातील आहेत.

या पोर्टलवर झालेल्या नोंदीप्रमाणे ग्रामीण भागात १८ बुथ निश्चित करण्यात आले आहेत. या बुथवर लसीकरण करण्यासाठी प्रशिक्षण दिलेले पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधित आरोग्य केंद्राचा ताफा तेथे व्यवस्थेसाठी असणार आहे. लसीचे साईड इफेक्ट आल्यास प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे १८ आॅक्सिजन व डॉक्टरांची सुविधा असलेल्या अ‍ॅम्बुलन्स सज्ज असणार आहेत. याचबरोबर लसीकरण बुथजवळील आठ आयसीओ सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

दररोज १८०० जणांना लस

ग्रामीण भागात दररोज १४०० जणांना लस दिली जाईल. लसीकरण वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पोर्टलवरील यादीप्रमाणे संबंधितांना लस कोणत्या दिवशी व किती वाजता दिली जाईल, याचा संदेश आदल्यादिवशी पाठवला जाणार आहे.

याठिकाणी होणार लसीकरण

अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, मंद्रुप, सांगोला ग्रामीण रुग्णालय, अकलुज, करमाळा, माळशिरस, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय, अश्विनी कुंभारी, जेऊर (करमाळा), कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, मजरेवाडी, सोरेगाव, भावनाऋझी, देगाव नागरी आरोग्य केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल याठिकाणी कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCorona vaccineकोरोनाची लसSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदHealthआरोग्यmedicineऔषधं