सांताक्रुज येथून निजामपुरात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 14:53 IST2020-05-28T13:17:30+5:302020-05-28T14:53:04+5:30

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव; बाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

Corona positive from Nizampur to Santacruz; Continue treatment in the intensive care unit | सांताक्रुज येथून निजामपुरात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

सांताक्रुज येथून निजामपुरात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; अतिदक्षता विभागात उपचार सुरू

ठळक मुद्देकोरोना विषयक चाचणीसाठी सोलापूरला पाठविले असता त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह मेडशिंगी येथील कोविंड केअर सेंटरमध्ये ठेवून संबंधित संपकार्तील व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात येणारसंबंधित व्यक्तीच्या घरातील अन्य तीन प्रत्यक्ष संपर्क न आलेल्या व्यक्तीचे खबरदारीचा उपाय

सांगोला : सोलापूर शहराबरोबरच आता कोरोना जिल्ह्यातील ग्रामीण भागात घुसला असून मुंबई सांताक्रुज येथून निजामपूर (ता. सांगोला) येथे गावी आलेला व्यक्ती कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण भागात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान त्या रुग्णावर सांगोल्यातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती प्रांत अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.

निजामपूर ता.सांगोला येथील गावात २४ मे रोजी सकाळी ६ च्या सुमारास एक व्यक्ती मुंबई सांताक्रुज येथून आलेला होता. त्यानंतर त्यास तात्काळ निजामपूर येथील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरणासाठी आणले होते. त्या व्यक्तीला ताप, कधीतरी खोकला असा त्रास होत असल्यामुळे ग्रामीण रूग्णालयात तपासणी करून सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशिंगी येथील कोविड केअर सेंटर मध्ये ठेवले होते. त्याचे नमुने कोरोना विषयक चाचणीसाठी सोलापूरला पाठविले असता त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. सदरचा व्यक्ती मुंबईहून आल्यापासून लगेच त्याचे विलगीकरण करण्यात आल्यामुळे त्याच्या निकटतम संपर्कात फक्त एक व्यक्ती आढळून आलेला आहे.

सदर व्यक्तीस निजामपूर येथील शाळेत अलहिदा संस्थात्मक विलगीकरण केले आहे. या व्यक्तीला मेडशिंगी येथील कोविंड केअर सेंटरमध्ये ठेवून संबंधित संपकार्तील व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीच्या घरातील अन्य तीन प्रत्यक्ष संपर्क न आलेल्या व्यक्तीचे खबरदारीचा उपाय म्हणून घरामध्ये विलगीकरण करून ठेवलेले आहे. करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची प्रकृती स्थिर व सुरक्षित असून संबंधित व्यक्तींच्या प्रकृतीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे तसेच मुंबई वरून मिरज मार्गे किडेबिसरी येथे येणाºया एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यास मिरज येथे शासकीय रूग्णालयात ठेवले आहे. त्याच्या प्रत्यक्ष संपर्कातील दोन व अन्य एक व्यक्ती याना कोविंड केअर सेंटर मेडशिंगी येथे ठेवले होते त्यांची कोरोनाबाबतची चाचणी घेण्यात आली असता चाचणीमध्ये बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व ३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले. 

Web Title: Corona positive from Nizampur to Santacruz; Continue treatment in the intensive care unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.