कोरोना लढ्यात पोलीस पुन्हा सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:40+5:302021-03-07T04:20:40+5:30

शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामुळे या लढ्यात पुन्हा पोलिसांची भूमिका निर्णायक ...

In the Corona fight, the police intervened again | कोरोना लढ्यात पोलीस पुन्हा सरसावले

कोरोना लढ्यात पोलीस पुन्हा सरसावले

Next

शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामुळे या लढ्यात पुन्हा पोलिसांची भूमिका निर्णायक ठरत आहे.

शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील विविध व्यापरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी नियमाचे पालन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय पोलिसांनी २६ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत विनामास्क फिरणाऱ्या १४७ लोकांवर कारवाई करत ७१ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोनि दीपरतन गायकवााड यांनी केले आहे.

Web Title: In the Corona fight, the police intervened again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.