शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्धे बनून ११ वर्षे फरार आरोपीला पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST

२००७ मध्ये एका खुनाच्या प्रकरणातील जेवर काळे हा आरोपी आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर तेव्हापासून तो फरार होता ...

२००७ मध्ये एका खुनाच्या प्रकरणातील जेवर काळे हा आरोपी आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्याचे नाव आल्यानंतर तेव्हापासून तो फरार होता; पण तो गुरुवारी दुपारी नरखेड येथे आल्याची माहिती सीआयडीला मिळाली. यावरून पोलीस नरखेड येथे गेल्यानंतर आरोपी तेथे असल्याची खात्री पटली. आरोपीला संशय आल्यास तो तेथून पळून जाईल म्हणून पोलिसांनी वेशांतर केले आणि एक पोलीस डॉक्टर, दुसरा शिक्षक आणि तिसरा सहायक झालेल्या तिघांनी मिळून नरखेड गावातील काही लोकांची तपासणी करत त्यांच्या घराजवळ गेले. त्यांच्या घरातील लोकांची तपासणी केली. जेव्हा आरोपी जेवर हा समोर आल्यानंतर त्याची खात्री करून त्याच्यात कोरोनाचे लक्षण असल्याचे सांगितले. त्याला नरखेड येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर त्याची अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यास सांगितले. दरम्यान, सीआयडींनी मोहोळच्या पोलिसांना खबर दिली़ पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्याला पकडण्यात आले.

ही कामगिरी सीआयडीचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम, हवालदार शिवाजी अंकलगीकर, हाजीमलंग शेख यांनी केली.

इन्फो बॉक्स

...आणि त्याने हत्यार काढून ठेवले

जेव्हा पोलिसांनी आरोपी जेवर काळे याचे पोलिसांनी तापमान आणि पल्स तपासणी करून त्याच्यात कोरोनाचे लक्षण असल्याबाबतचे सांगून हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी येण्यास सांगितले़, तेव्हा आरोपीने आपल्या कंबरेला बांधलेले धारधार हत्यार घरीच काढून ठेवले़ त्यानंतर तो पोलिसांच्या सोबत हॉस्पिटलकडे आला. त्यामुळे त्याला सहजपणे पकडता आले.