शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांना धडक देत कुंभारीच्या वेशीत अडकलेल्या कंटेनरने घेतला दोघांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:49 IST

कुंभारीत रास्ता रोको : थरार पाहून ग्रामस्थ झाले भयभीत

सोलापूर : वळसंगहून सोलापूरकडे निघालेल्या कंटेनरने एसटी बस, तीन कार आणि दुचाकीस्वारांना धडक देत कुंभारीच्या वेशीत येऊन धडकला अन्‌ तेथेच अडकून पडला. या थरारक अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या थरारक अपघातामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. कुंभारीच्या ग्रामस्थांनी तर रास्ता रोको करून या घटनेचा संताप व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वळसंग येथे एका दुचाकीस्वाराला कट मारल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी कंटेनर चालकाला मारहाण केली. ग्रामस्थांच्या तावडीतून कसेबसे सुटत कंटेनरचालक जोराने गाडी चालवत कुंभाराच्या दिशेने निघाला. मार्गात कंटेनरने चालकाने एसटी, तीन कार, दोन दुचाकी गाड्यांना धडक दिली. वळसंगला दिलेल्या धडकेत सकलेन मोहम्मद कासिम कुरेशी (वय २०, रा. वळसंग), रोहित चौगुले (मृत पूर्ण उपलब्ध झाले नाही) या दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला, तर कुंभारी येथे दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्यामुळे सुभाष छपेकर, अमित छपेकर हे दोघे जखमी झाले. यातील सुभाष यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तत्पूर्वी, कुंभारी ग्रामस्थांनी कंटेनरचालकाला पकडून ठेवले.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी कुंभारी रस्त्यावर रास्ता रोको केले. यामुळे काही काळ तेथे तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत करण्याचे प्रयत्न केले.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यू