सोलापूर महापालिका परिवहन सभापतीसाठी काँग्रेसची एमआयएमला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:46 PM2018-03-15T12:46:47+5:302018-03-15T12:46:47+5:30

सभापतीपदासाठी तिघांचे अर्ज: शिवसेनेची भूमिका आज ठरणार

Congress of MIMAL with Solapur Municipal Transportation Chairman | सोलापूर महापालिका परिवहन सभापतीसाठी काँग्रेसची एमआयएमला साथ

सोलापूर महापालिका परिवहन सभापतीसाठी काँग्रेसची एमआयएमला साथ

Next
ठळक मुद्देपरिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक १६ मार्च रोजी होणार सभागृह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला

सोलापूर : अखेरच्या घटका मोजत असलेल्या परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपाबरोबरच शिवसेना आणि एमआयएमच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे मनपा निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढविलेल्या एमआयएमच्या उमेदवारांना काँग्रेसच्या सदस्यांनी साथ दिली आहे. 

परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक १६ मार्च रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज दिवस होता. सकाळी साडेअकरा वाजता भाजपतर्फे गणेश जाधव यांनी नगर सचिव कार्यालयात येऊन दोन वेगवेगळे उमेदवारी अर्ज दाखल केले. सकाळी साडेदहा वाजता प्रदेश भाजपकडून जाधव यांचे नाव आल्यावर शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, मावळते सभापती दैदीप्य वडापूरकर, संजय कोळी, राजेश काळे, श्रीशैल बनशेट्टी, वीरेश उंबरजे, भैरप्पा भैरामडगी, संतोष कदम, मल्लिनाथ सरगम आदी उपस्थित होते. त्यानंतर १२ वाजेच्या सुमाराला शिवसेनेतर्फे तुकाराम मस्के यांनी उमेदवारी दाखल केली.

त्यांच्यासमवेत परशुराम भिसे, विजय पुकाळे उपस्थित होते. दुपारी दीड वाजेच्या सुमाराला एमआयएमतर्फे साकीर सगरी यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांच्या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून काँग्रेसचे सदस्य नितीन भोपळे व टेकाळे यांनी सह्या केल्या आहेत. भविष्यातील आडाखे डोळ्यांसमोर ठेवून महाआघाडी कायम ठेवण्यासाठी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते   महेश कोठे यांच्याशी गुरुवारी बातचीत करून शिवसेनेची भूमिका ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

परिवहन समितीत भाजपचे सहा तर शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे दोन आणि एमआयएमचा एक सदस्य आहे. भाजपचा सभापती होण्यासाठी स्थायी समितीचा सभापती असणे गरजेचे होते. आता दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडणार असल्याने चिठ्ठीद्वारे सभापतीचे भवितव्य ठरणार आहे. 

शिवसेनेतर्फे उमेदवारी दाखल करण्यात आलेली असली तरी झोन समिती, स्थायी समिती निवडणुकीचे गणित गृहीत धरल्यास एमआयएमसाठी माघार घेतली जाऊ शकते, असे चित्र दिसत आहे. १६ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन सभापतीची निवडणूक पार पाडली जाणार आहे. परिवहन सभापतीपदासाठी आज उमेदवारी दाखल करण्याचा दिवस असल्याने सभागृह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

मनपा परिवहनची स्थिती बिकट
मनपा परिवहनची स्थिती सध्या एकदम बिकट आहे. ४५० कर्मचारी आणि मार्गावर केवळ २७ बस धावत आहेत. उत्पन्न दीड लाखांवर तर खर्च साडेपाच लाखांवर आहे. त्यामुळे परिवहनला दैनंदिन तीन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. कर्मचाºयांना गेल्या आठ महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे काम करण्याची त्यांची मानसिकता नाही. संपावर जाण्याची कर्मचाºयांनी तयारी केली आहे. प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे रजेवर गेले आहेत. परिवहनची अशी स्थिती असतानाही सभापतीच्या गाडीसाठी रस्सीखेच दिसून येत आहे. 

Web Title: Congress of MIMAL with Solapur Municipal Transportation Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.