शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जुळ्या बहिणींशी लग्न केल्यानं पोलिसांत तक्रार दाखल; तरुणावर कारवाई होणार?, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 5:04 PM

सदर प्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केली आहे.

मुंबई येथे राहणाऱ्या जुळ्या बहिणींना लहानपणापासून एकत्र राहण्याची सवयच लागल्यामुळे दोघांनीही आयुष्याचा साथीदार हा एकच निवडला आहे. या तिघांचा विवाह अकलूज येथे पार पडला. गजब कहाणीतून प्रेम निर्माण झाल्यामुळे अजब लग्न पार पडले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाच्या आणि जुळ्या बहिणींच्या आनंदावर विरजण पडले.

सदर प्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केली आहे. नवरदेवाच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल झाला आहे. त्यामुळे आता या नवरदेवावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. मात्र कायदा काय सांगतो, जाणून घ्या...

भारतीय दंड विधान 494 नुसार पती किंवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करता येत नाही. असं केल्यास ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र स्वखुशीने जर दोन्ही पत्नी राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही असं मत अॅड. असीम सरोदे यांनी सांगितलं. भारतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. पण समजा दोन्ही पत्नी स्वखुशीने आणि सहमतीने जर नांदत असतील तर हा गुन्हा ठरत नाही. कारण देशातील अनेक भागात दोन लग्नांची पद्धत दिसून येते. जर त्या मुली एकाच पतीसोबत राहण्यास तयार असतील तर इतर व्यक्ती त्यात काही हस्तक्षेप करू शकत नाही, असं असीम सरोदे यांनी सांगितलं.

जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाच्या अंगलट; दुसऱ्याच दिवशी आनंदावर पडलं विरजण!

तत्पूर्वी, जन्म, बालपण, शिक्षणच काय, तर नोकरीही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींची ही आयुष्याची गोष्ट. दोघींना एकमेकींची इतकी सवय लागली की, त्या एकमेकींशिवाय राहणे कठीण बनले होते. इतकेच काय, तर एकमेकींची आवड- निवडही एकसारख्याच झाल्या होत्या. कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित असून आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी. वडिलांच्या पश्चात आईसोबत राहत होत्या. 

सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने तिघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिघींच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचे प्रेम हे अतुलबरोबर जडले, पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होऊन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ-

अकलूजमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो व चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातून चर्चा होत मिम्सचा अक्षरश: धुमाकूळ घातला. काहींनी आम्हाला एक वधू मिळत नाही, म्हणून खंत व्यक्त केली, तर काहींनी एकीलाच सांभाळणं कठीण होत असल्याचे सांगितले. काहींनी तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असेही मत मांडले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्नSolapurसोलापूरMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र