शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर स्वच्छतेसाठी दीड हजार वारकरी

By admin | Updated: June 22, 2014 00:40 IST

जनजागृतीवर भर : शौचालयांसाठी हायकोर्ट आग्रही

मुंबई : यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांनी उघड्यावर कोठेही शौचास बसून तेथे घाण करू नये यासाठी आता वारकरी संघटनांनी पुढाकार घेतला असून, दीड हजार वारकरी यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली.पुणे येथील वारकरी साहित्य परिषद या संघटनेचे विठ्ठल पाटील यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही माहिती उच्च न्यायालयाला दिली. तसेच स्वच्छतेसाठी पंढरपूर येथे शासन दीड लाख पत्रके वाटणार असून, हे कामदेखील वारकरीच करणार असल्याचेही अ‍ॅड. सरोदे यांनी न्यायालयाला सांगितले.न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली. ती ग्राह्य धरत न्यायालयाने येथे युद्धपातळीवर शौचालये उभारण्याचे आदेश शासनाला दिले. ही शौचालये नेमकी कोठे असावीत व याविषयी जनजागृती कशा प्रकारे केली जाणार यासाठी पंढरपूर नगर परिषद, वारकरी व सामाजिक संघटना यांनी येत्या सोमवारी बैठक घेऊन याचा आराखडा पुढील बुधवारी न्यायालयात सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी मानवी विष्ठा वाहतूकविरोधी संघटनेचे अध्यक्ष संदीप जेठे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ मानवी विष्ठा वाहतूक प्रतिबंधक कायदा १९९३मध्ये मंजूर झाला़ त्याअंतर्गत हे काम करणाऱ्यांसाठी घरकुलासह विविध योजना राबविणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते व हे काम मानवाकडून न करता अत्याधुनिक तंत्राद्वारे केले जाणार होते़ मात्र पंढरपूर मंदिरात येणारे भाविक चंद्रभागा नदीपात्रातच प्रात:कालीन विधी उरकतात व त्यांची विष्ठा मानवाकडूनच उचलली जाते़ हे बंद करावे व राज्यात वरील कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयानेच शासनाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़याचे प्रत्युत्तर सादर करताना पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रवींद्र जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाकडे याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाची माहिती न्यायालयाला दिली़ ------------------अलोट गर्दी, सार्वजनिक अस्वच्छतापंढरपूर हे १९़५६ चौ़ कि़मी.वर वसलेले आहे़ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात़ त्यात आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी उत्सवासाठी येथे भक्तांची अलोट गर्दी असते़ त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपालिकेने शौचालये बांधली असून, यासाठी फिरत्या शौचालयांचीही व्यवस्था केली जाते़ तसेच उघड्यावर प्रात:कालीन विधी करू नका, असे आवाहनही नगरपालिका करते़ तरीदेखील भक्तगण उघड्यावरच विधी उरकतात़ ४हे टाळण्यासाठी नवीन शौचालयांची आवश्यकता असून, त्यासाठी लागणाऱ्या निधीचा तपशील देऊन आम्ही शासनाकडे २००९मध्ये प्रस्ताव सादर केला आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे़