धक्कादायक; विजेचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:22 IST2020-09-11T14:22:08+5:302020-09-11T14:22:33+5:30

सोलापूर लोकमत विशेष...

Chimukli dies of electric shock; Incidents in Mohol taluka | धक्कादायक; विजेचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना

धक्कादायक; विजेचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे राहत्या घराच्या पत्र्याला हात लावल्याने विजेचा धक्का बसून वैष्णवी विकास गावडे ( वय २ वर्ष) या चिमुकलीचा मृत्यू झाला. हा प्रकार गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

वैष्णवी गावडे ही पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होती. खेळत खेळत तिने पत्र्याला हात लावला तेव्हा तिला अचानक विजेचा धक्का बसला. बेशुद्ध पडल्याने तिला कामती येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी तिला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे वाघोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. 

Web Title: Chimukli dies of electric shock; Incidents in Mohol taluka