नीरा नदीच्या कालव्यात कार पडली, तिघांचा दुदैवी मृत्यू, नातेपुते गावाजवळील घटना

By आप्पासाहेब पाटील | Updated: April 3, 2026 13:27 IST2026-04-03T13:21:57+5:302026-04-03T13:27:38+5:30

Solapur Accident News: माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील नीरा नदीच्या कालव्यात कार कोसळली. या झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

Car falls into Nira river canal, three die, incident near Natepute village | नीरा नदीच्या कालव्यात कार पडली, तिघांचा दुदैवी मृत्यू, नातेपुते गावाजवळील घटना

नीरा नदीच्या कालव्यात कार पडली, तिघांचा दुदैवी मृत्यू, नातेपुते गावाजवळील घटना

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर -  माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील नीरा नदीच्या कालव्यात कार कोसळली. या झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबईहून नातेपुतेकडे येत असताना भरधाव वेगातील कार आळंदी - पंढरपूर मार्गावरील निरा उजव्या कालव्याजवळ सेरेपूल नजीक निरा उजव्या कालव्यात कोसळली. या घटनेत सासू-सासरे व पत्नीचा मृत्यू झाला असून जावाई गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून कालव्यातील पाण्यातून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी क्रेन व जेसीबीची मदत घेतली जात आहे. 

 

Web Title : नीरा नहर में कार गिरी: नातेपुते के पास तीन की मौत

Web Summary : नातेपुते गांव के पास नीरा नहर में कार गिरने से तीन लोगों की मौत हो गई। मुंबई से यात्रा कर रहे एक परिवार से जुड़ी यह घटना शुक्रवार सुबह हुई। एक दामाद गंभीर रूप से घायल; पुलिस जांच कर रही है।

Web Title : Car plunges into Neera canal: Three dead near Natepute.

Web Summary : A car accident near Natepute village resulted in three fatalities after a vehicle plunged into the Neera canal. The incident occurred Friday morning involving a family traveling from Mumbai. A son-in-law was severely injured; police are investigating.