खोपोलीजवळ कार-कंटेनरचा थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, चार जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:14 IST2022-02-15T11:13:51+5:302022-02-15T11:14:52+5:30

दोन कंटेनरमध्ये ही कार चेपली गेली. त्यात कारचा चक्काचूर झाला. पुण्यातील या गाडीमधील सोलापुरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

Car-container Accident near Khopoli; Four died on the spot | खोपोलीजवळ कार-कंटेनरचा थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, चार जण जागीच ठार

खोपोलीजवळ कार-कंटेनरचा थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, चार जण जागीच ठार

सोलापूर - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात मंगळवारी सकाळी कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कारमधील सोलापूरच्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात बोरघाटातील खोपोली जवळ घडला. तब्बल चार वाहने एकामेकाना धडकल्याने हा अपघात झाला. 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर दोन मार्गिकेमधून दोन कंटेनर जात होते. यामुळे मागून येणाऱ्या छोट्या वाहनांना पुढे जाण्यासाठी जागाच राहिली नव्हती. या दोन कंटेनरमधून वेन्यू कारने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन कंटेनरमध्ये ही कार चेपली गेली. त्यात कारचा चक्काचूर झाला. पुण्यातील या गाडीमधील सोलापुरातील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

अशी आहेत मृतांची नावं -
गौरव खरात (36, रा. वाडिया हॉस्पिटल जवळ), सौरभ तुळसे (रा. फॉरेस्ट), मलिक राजगुरू (रा. फॉरेस्ट) आणि एक जण तुळजापूरचा आहे.
 

Web Title: Car-container Accident near Khopoli; Four died on the spot