कार व मोटरसायकलचा अपघात; आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:19 PM2020-06-22T22:19:18+5:302020-06-22T22:20:57+5:30

अक्कलकोटजवळील अपघात;  तिघे गंभीर जखमी, अक्कलकोट शहर पोलीस घटनास्थळी दाखल

Car and motorcycle accidents; Death of junior assistant in health department | कार व मोटरसायकलचा अपघात; आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यकाचा मृत्यू

कार व मोटरसायकलचा अपघात; आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकार व मोटरसायकलचा झाला अपघात, तिघे जखमीअपघाताची माहिती मिळताच अक्कलकोट शहर पोलीस घटनास्थळी दाखलअपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

सोलापूर : सोलापूरअक्कलकोट रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर कार व मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातात सोलापूर आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघेजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.


गौसपाशा बागवान (रा. सलगर तालुका अक्कलकोट)
असे ठार झालेल्या कनिष्ठ सहायकाचे नाव आहे. मयत बागवान हे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम पाहत होते, सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजता ड्युटी संपवून मोटरसायकलवरून गावाकडे परत निघाले होते त्यावेळी समोरून येणाऱ्या कारणे त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, जखमी तिघेजण सोलापूर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच अक्कलकोट शहर पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  जखमींवर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Car and motorcycle accidents; Death of junior assistant in health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.