शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

ग्रामपंचायतींसाठी आता ‘ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी’

By admin | Updated: August 6, 2014 01:14 IST

राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती : देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींना लाभ

 सोलापूर :‘राष्ट्रीय विकास’ योजनेंतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायती नॅशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्क योजनेद्वारे ब्रॉडबॅण्ड इंटरनेटने जोडण्यात येणार असून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असेल. यामुळे खेड्यापाड्यात ई-पंचायत (संग्राम) प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग येणार आहे.फायबर नेटवर्क ही योजना राबविण्यासाठी युनिव्हर्सल सर्व्हिस आॅब्लिगेशन फंडद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र, राज्य शासन व बीबीएनएलमध्ये (भारत ब्रॉडबॅण्ड नेटवर्क लि.) मागील वर्षी १२ एप्रिल रोजी संयुक्त करार झाला आहे. याच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात राज्याच्या ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव एस. एस. संधु यांनी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आदेश जारी केला आहे. फायबर नेटवर्क इंटरनेट सुविधा देण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या केबलमुळे रस्ते व इमारतीचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई बीबीएनएल कंपनी देणार आहे. यामुळे फायबर केबल टाकण्यासाठी ग्रामसभा, आमसभा घेण्याची आवश्यकता नाही. मात्र कार्यालयाच्या जवळ ७ बाय ७ फुटाची जागा उपलब्ध करून द्यायची आहे, असे आदेशात म्हटले आहे. ------------------------------गावच्या कारभाराला येईल गतीसध्या राज्यातील २८ हजारपैकी अनेक ग्रामपंचायतींपर्यंत इंटरनेट पोहोचले नाही. या आॅप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे इंटरनेट ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हीटी मिळाल्याने ग्रामपंचायत पातळीवरच्या कारभाराला गती येणार आहे. अनेक सुविधा या सध्या इंटरनेटच्या माध्यमातून दिल्या जात आहेत.------------------------------------सध्या ही राज्यातील ग्रामपंचायतींना संग्रामच्या माध्यमातून इंटरनेट सेवा दिली आहे. त्याला म्हणावा तसा वेग नाही. जेथे इंटरनेट नाही तेथेही बीबीएनएलच्या माध्यमातून इंटरनेट जाईल. यामुळे ग्रामपंचायतींच्या माहितीची देवाणघेवाण होण्यास मदत होणार आहे. -वीरेंद्र सिंह, संचालक, माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र शासन