धक्कादायक; गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 13:00 IST2021-02-08T12:50:07+5:302021-02-08T13:00:41+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

धक्कादायक; गोकुळ शुगर्सचे चेअरमन भगवान शिंदे यांचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळला
सोलापूर : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे यांचा मृतदेह आज सोमवारी सकाळी मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रेल्वे रुळावर आढळून आला.
भगवान शिंदे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत ती घरीच परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरून खाली पडल्याने छिन्ह विच्छिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतला आणि रेल्वे हॉस्पिटलला घेऊन गेले तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आहे. नातलगांनी शोधाशोध केल्यानंतर सकाळी नऊ वाजता शासकीय रुग्णालयात अनोळखी मृतदेह आल्याची माहिती मिळाली, त्यानंतर हा मृतदेह भगवान शिंदे यांचा असल्याची खात्री पटली आहे.