रेल्वे स्टेशन परिसरात खून

By Admin | Updated: May 21, 2014 01:20 IST2014-05-21T01:20:17+5:302014-05-21T01:20:17+5:30

पंढरपूर : येथील रेल्वेस्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीचा दगडाने मारहाण करुन खून केला.

Blood in the railway station premises | रेल्वे स्टेशन परिसरात खून

रेल्वे स्टेशन परिसरात खून

पंढरपूर : येथील रेल्वेस्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीचा दगडाने मारहाण करुन खून केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. पंढरपूर रेल्वेस्थानकावर सतत गर्दी असते. असे असतानाही रेल्वे स्थानकापासून जवळच्या ठिकाणीच एका ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दगडाने व हत्याराने डोक्यात व चेहर्‍यावर गंभीर जखमा करुन खून केला. या विषयीची माहिती उपविभागीय अधिकारी प्रशांत कदम व पो. नि. बालासाहेब रेड्डी यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत त्यांनी परिसरात चौकशीही केली. पंधरा दिवसांपूर्वीच शहरातील गर्दीच्या ठिकाणच्या बेणारे रुग्णालयाच्या तळमजल्यावर एका महिलेचा अज्ञात कारणासाठी खून झाला होता़

 

Web Title: Blood in the railway station premises