शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

धन्य आजि दिन सोनियाचा!

By admin | Updated: July 8, 2014 23:49 IST

पंढरीत आठ लाख भाविक; आज आषाढी एकादशीचा महासोहळा, दर्शन रांगेत भाविकांची दाटी

 पंढरपूर: ‘पावलों पंढरी वैकुंठभुवन। धन्य आजि दिन सोनियाचा ।...पावलों पंढरी पार नाहीं सुखा। भेटला हा सखा मायबाप।...पंढरीत संतसज्जनांचा मेळा जमला असून, लाखो वैष्णवजनांच्या उपस्थितीत बुधवारी आषाढी एकादशीचा महासोहळा होत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा करणार आहेत. आठ लाखांहून अधिक भाविकांची मांदियाळी असल्याने चंद्रभागा वाळवंटात भक्तांची दाटी झाली आहे.मैलोन्मैल पायी प्रवास करीत संतांच्या पालख्या मंगळवारी सायंकाळी रिंगण, खेळ, धावा करीत लाडक्या सावळ्या विठुरायाला उराउरी भेटण्यासाठी पंढरीत दाखल झाल्या आहेत. वैष्णवजनांनी चंद्रभागा वाळवंट, मठ, मंदिरे, धर्मशाळा, रेल्वे मैदान, उपनगर, खासगी वाडे, मोकळ्या जागेवर पावसापासून बचाव करण्यासाठी तंबू व राहुट्या टाकून वास्तव्यास आहेत. सध्या पाऊस पडत असला तरी तत्पूर्वीच्या दुष्काळी स्थितीमुळे यंदा वारकऱ्यांची संख्या कमी आहे; पण पालख्या पंढरीत दाखल होताच वरूणराजाने कृपादृष्टी दाखवत दमदार हजेरी लावल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत आहे. मोठ्या प्रमाणात वारकरी दर्शन रांगेत थांबल्याने पददर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली असून, यामध्ये दीड ते पावणेदोन लाख भाविक असल्याने दर्शनासाठी दहा तासांचा कालावधी लागत आहे. मुखदर्शन रांगही तुकाराम भवन ओलांडून संभाजी चौकापर्यंत पोहोचली आहे. काही वारकरी नगरप्रदक्षिणा कळस व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाला भेटल्याचा आनंद व्यक्त करीत आहेत. ज्ञानदेव, सोपानकाका, मुक्ताबाई यांची बंधूभेट होताच वारकऱ्यांनी जल्लोष करीत बंधूभेटीचा सोहळा अनुभवला. पंढरपुरात येणारे सर्व रस्ते भाविकांनी भरून गेले होते तर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस बॅरिकेडिंग करून भाविकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेत आहेत. जड वाहतूक बाहेरून वळविल्याने भाविकांना त्रास होत नव्हता. वाळवंट, महाद्वार घाट, चौफाळा, भक्तिमार्ग, स्टेशन रोड, सरगम चौक, तीन रस्ता, शेगाव दुमाला, टाकळी परिसर, सांगोला रोड, टेंभुर्णी मार्ग या परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक वास्तव्यास आहेत. ----------------------------------------मुख्यमंत्र्यांचे आगमनविठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पंढरपुरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले आहेत. पहाटे अडीच वाजता महापूजा करून ते पुन्हा बुधवारी सकाळी मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.आज विठ्ठल रथाची मिरवणूकदेवशयनी एकादशीनिमित्त दुपारी अडीच वाजता सजविलेल्या विठ्ठलाच्या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या रथावर खारीक, बदाम, नारळ टाकून रथात ठेवलेल्या विठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येणार आहे.संतांच्या पादुकांना चंद्रभागा स्नानपंढरीत दाखल झालेल्या संतांच्या पादुकांना बुधवारी पहाटे चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात येणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असून, यावेळी पादुकांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. भाविकांचे हालमंगळवारी रात्री आठच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत पडत असल्याने पददर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. चिखल, वर पावसाची रिपरिप, अंगाला झोंबणारा गार वारा आणि दर्शन रांग परिसरात असलेल्या गटारी व अस्वच्छतेमुळे झालेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे भाविकांचे हाल झाले.