सोलापुरात भाजपचा घंटानाद आंदोलन; काय आहे कारण वाचा सविस्तर बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:24 IST2020-08-29T13:20:21+5:302020-08-29T13:24:08+5:30
सोलापूर लोकमत विशेष...

सोलापुरात भाजपचा घंटानाद आंदोलन; काय आहे कारण वाचा सविस्तर बातमी
सोलापूर : सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सोलापूर शहरातील काळजापूर मारूती मंदिरासमोर माजी पालकमंत्री आ़ विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ याशिवाय अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर भाजपने आंदोलन केले़ याशिवाय सांगोला येथे श्री अंबिका देवी मंदिराच्या पायरीवर बसून घंटानाद आंदोलन केले़ यावेळी तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनकर यांना निवेदन दिले.
मोहोळ शहरातही भाजपचे दोन वेगवेगळी आंदोलने झाली़ मोडनिंब येथे हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले़ याशिवाय माढा, पंढरपूर, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर आदी तालुक्यात भाजपच्यावतीने आंदोलन करून मंदिरं खुली करण्याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.