शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

भाजप आमदारांचा उपोषणाचा इशारा; सोलापूरला मिळाले १८९० रेमडेसीवीर इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 1:31 PM

सोलापूर : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार व खासदारांनी उपोषणाचा इशारा देताच सोलापूरला मंगळवारी तब्बल ...

सोलापूर : बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप आमदार व खासदारांनी उपोषणाचा इशारा देताच सोलापूरला मंगळवारी तब्बल १८९० रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे.

शहर व जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यातील गंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत आहे. मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा खूपच कमी आहे.

पुणे विभागाला इंजेक्शनचा पुरेसा साठा मिळूनही सोलापूरवर अन्याय केला जात होता. अगोदरच बेड, वेंटीलेटर आणि ऑक्सिजनअभावी रुग्णांची हेळसांड होत होती. अशातच रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. सोलापूरला उपलब्ध झालेला इंजेक्शनचा कोटा पुण्याला पळविला जात असल्याचा आरोप करून भाजप आमदारांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली होती. त्याचबरोबर येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत राज्य शासनाने पहिल्यांदाच सोलापूरला मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत.

आता मिळणाऱ्या या इंजेक्शनमधून सोलापूर महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांसाठी ७७५, बार्शी व उत्तर तालुक्यासाठी २७३, अक्कलकोट व दक्षिण सोलापूरसाठी ५३,  मोहोळ आणि पंढरपूरसाठी ३२१,  सांगोला, मंगळवेढ यासाठी १३६, माळशिरस १९८, माढा व करमाळा तालुक्यासाठी १३४ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाMLAआमदारPoliticsराजकारणremdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्या