पवार कुटुंबियांकडून कायमच समाजात विष पेरण्याचे काम; भाजप आमदार सुभाष देशमुख यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 14:40 IST2023-01-02T14:37:06+5:302023-01-02T14:40:56+5:30

अजित पवार यांच्या विरोधात निदर्शने. 

bjp mla subhash deshmukh criticised work of pawar family to sow poison in the society forever | पवार कुटुंबियांकडून कायमच समाजात विष पेरण्याचे काम; भाजप आमदार सुभाष देशमुख यांची टीका 

पवार कुटुंबियांकडून कायमच समाजात विष पेरण्याचे काम; भाजप आमदार सुभाष देशमुख यांची टीका 

राकेश कदम, सोलापूर: छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते हे अजित पवार यांचे बेताल वक्तव्य आहे. पवार कुटुंबीयांकडून नेहमीच समाजात विष पेरण्याचे काम केले जाते, अशी टीका भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी सोमवारी केली.

अजित पवारांच्या  यांच्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी  सलगर वस्ती येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

आमदार देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे थोर पुरुष होते. देव,  धर्म आणि देशाचे रक्षण करणारे धर्मवीर होते. थोर पुरुषांबद्दल बोलताना अजित पवार यांनी जीवेवर भान ठेवायला पाहिजे होते. पवार कुटुंबीयांकडून कायमच अशी समाजात विष पेरणारे वक्तव्य केली जातात.  याचा भारतीय जनता पक्षाकडून निषेध करण्यात येत आहे.   संभाजी महाराजांचा इतिहास बघितला तर संभाजी महाराजांनी एकही लढाई हारलेली नाही अशा, धर्मवीर  संभाजी महाराज यांच्याविरुद्ध बोलणे चुकीचे आहे. 

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मनीष देशमुख यांनीही अजित पवार यांचा निषेध केला. यावेळी अजित पवार यांचा धिक्कार असो, अजित पवार यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय, धरणबहाद्दुर अजित पवार, जनता करेल तुला तडीपार अशा घोषणा देऊन निषेध केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp mla subhash deshmukh criticised work of pawar family to sow poison in the society forever