मोठी बातमी; मराठा क्रांतीचाचा उद्या विराट मोर्चा; सांगली, साताऱ्याचे पोलीस येणार सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 09:54 IST2021-07-03T09:46:30+5:302021-07-03T09:54:12+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Big news; Virat Morcha of Maratha Revolution tomorrow; Sangli, Satara police will come to Solapur | मोठी बातमी; मराठा क्रांतीचाचा उद्या विराट मोर्चा; सांगली, साताऱ्याचे पोलीस येणार सोलापुरात

मोठी बातमी; मराठा क्रांतीचाचा उद्या विराट मोर्चा; सांगली, साताऱ्याचे पोलीस येणार सोलापुरात

सोलापूर : मराठा क्रांती मोर्चाचा सोलापुरात उद्या रविवार ४ जुलै रोजी विराट मोर्चा निघणार आहे. या मोर्चा च्या बंदोबस्तासाठी सांगली, सातारावरून पोलिस बंदोबस्त मागितला आहे.  दुपारी बारा वाजेपर्यंत सांगली, साताराहून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त सोलापुरात हजर करण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोनाचा पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा ला परवानगी नाकारली आहे, त्याबाबत मोर्चाचे समन्वयक संयोजक यांना नोटीस दिली आहे. नोटीस बजावून हे मोर्चा काढल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Big news; Virat Morcha of Maratha Revolution tomorrow; Sangli, Satara police will come to Solapur