मोठी बातमी; सोलापूरच्या विद्या कुलकर्णी बनल्या सीबीआय सहसंचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 11:35 IST2021-11-19T11:34:32+5:302021-11-19T11:35:02+5:30

सोलापूर लोकमत विशेष

Big news; Vidya Kulkarni from Solapur becomes CBI Joint Director | मोठी बातमी; सोलापूरच्या विद्या कुलकर्णी बनल्या सीबीआय सहसंचालक

मोठी बातमी; सोलापूरच्या विद्या कुलकर्णी बनल्या सीबीआय सहसंचालक

सोलापूर : तामिळनाडू लाचलुचपत प्रतिबंधक महानिरीक्षक आणि सोलापूरच्या कन्या विद्या कुलकर्णी सीबीआय सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


केंद्र सरकारने तामिळनाडू लाचलुचपत प्रतिबंधक आणि गुप्तचर विभागाच्या पोलीस महासंचालक विद्या कुलकर्णी यांची सीबीआयच्या सहसंचालकपदी नियुक्ती केली आहे. विद्या कुलकर्णी या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे (उत्तर सोलापूर ) येथील असून सहसंचालकपदी नियुक्ती करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा आदेश जारी केला आहे. विद्या कुलकर्णी, १९९८ पासून तामिळनाडूच्या आयपीएस अधिकारी, ५ वर्षांपासून सीबीआय च्या सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, त्यांच्यासोबतच केंद्र सरकारने ओडिशाचे पोलिस आयपीएस अधिकारी नजानिश्याम उपाध्याय आणि महाराष्ट्र पोलिस आयपीएस अधिकारी नवल बजाज यांचीही सीबीआय सहसंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीनंतर सोलापुरात आनंद व्यक्त केला जात आहे.

Web Title: Big news; Vidya Kulkarni from Solapur becomes CBI Joint Director