मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस उद्यापासून धावणार 

By Appasaheb.patil | Published: June 30, 2021 05:19 PM2021-06-30T17:19:55+5:302021-06-30T17:20:25+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Big news; Solapur-Pune-Solapur Hutatma Superfast Special Express will run from tomorrow | मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस उद्यापासून धावणार 

मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस उद्यापासून धावणार 

googlenewsNext

सोलापूर - मध्य रेल्वेनेसोलापूर विभागातील  प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधासाठी गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस  १ जुलैपासून आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. या गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. 

•    गाडी क्र. 01158 सोलापूर-पूणे सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस १ जुलैपासून पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदर गाडी सोलापूर स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, ,मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार ) रोजी सकाळी 06.30 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन सकाळी 07.17 प्रस्थान 07.20, दौंड स्थानकावर आगमन सकाळी 09.08 प्रस्थान 09.10 आणि पूणे स्थानकावर सकाळी 10.30 वाजता पोहचेल.
•    गाडी क्र. 01157 पूणे- सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस  दिनांक 01.07.2021 पासून पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे. सदर गाडी पूणे स्थानकावरून आठवड्यातून पाच दिवस (सोमवार, ,मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार ) रोजी संध्याकाळी 06.10 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक दौंड आगमन रात्री 07.13 प्रस्थान 07.15, कुर्डुवाडी स्थानकावर आगमन रात्री 08.47 प्रस्थान 08.50 आणि सोलापूर स्थानकावर रात्री 10.00 वाजता पोहचणार आहे.  या गाडीला २ ब्रेकयान, १३ व्दितीय श्रेणी, १ एसी चेअर कार असे एकूण १६ कोचेच असणार आहेत. तरी या गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Web Title: Big news; Solapur-Pune-Solapur Hutatma Superfast Special Express will run from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.