मोठी बातमी; रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली; केम स्टेशनजवळील घटना

By Appasaheb.patil | Updated: September 4, 2022 10:51 IST2022-09-04T10:49:01+5:302022-09-04T10:51:07+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

big news; Railway freight train derailed; An incident near a chem station | मोठी बातमी; रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली; केम स्टेशनजवळील घटना

मोठी बातमी; रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली; केम स्टेशनजवळील घटना

सोलापूर : सोलापूर हुन पुण्याच्या दिशेने निघालेली मालगाडी केम (तालुका करमाळा) रेल्वे स्टेशन परिसरात घसरली. ही घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागातून धावणारी मालगाडी रविवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर पुण्याकडे मार्गस्थ झाली. सकाळी सातच्या सुमारात केम (तालुका करमाळा) हद्दीत ती घसरली व शेतातील मातीत जावून फसली. या घटनेत रेल्वेचे नुकसान झाले असून दोन ते तीन डबे रुळावरून खाली घसरल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर विभागातील रेल्वे आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वेची वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळावर पोहोचले आहेत. रुळावरून खाली घसरलेले डबे पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी रेल्वेचा अपघात विभाग प्रयत्न करीत आहे. 

 

Web Title: big news; Railway freight train derailed; An incident near a chem station