Beraking; सोलापूरचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 14:05 IST2020-06-14T13:25:20+5:302020-06-14T14:05:28+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Beraking; सोलापूरचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे निधन
सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय सोलापूरचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे वयाच्या 80 व्या वर्षी रविवारी अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे
१९६९, १९७५ आणि १९८५ साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. १९७५ मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. १९९० झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र १९९८ साली सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले.