शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन किलोमीटरच्या देगाव जलसेतूला ग्रामपंचायतीच्या १३ गुंठ्यांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 20:41 IST

घोळ कायम : रेल्वेने परवानगी दिल्याने रखडलेले ९६ मीटरचे काम लागणार मार्गी

ठळक मुद्देरेल्वे खात्याने मंजुरी दिल्याने देगाव जलसेतूच्या उर्वरित ९६ मीटर कामाला सुरुवात होणार तरी पुढील कालव्याच्या कामासाठीचा अवघ्या १३ गुंठ्यावरील अतिक्रमित जागेचा अडथळा कायम बरखास्त ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली १३ गुंठ्यातील अतिक्रमण काढणार कोण?

सोलापूर: रेल्वे खात्याने मंजुरी दिल्याने देगाव जलसेतूच्या उर्वरित ९६ मीटर कामाला सुरुवात होणार असली तरी पुढील कालव्याच्या कामासाठीचा अवघ्या १३ गुंठ्यावरील अतिक्रमित जागेचा अडथळा कायम आहे. बरखास्त ग्रामपंचायतीच्या नावावर असलेली १३ गुंठ्यातील अतिक्रमण काढणार कोण? व जमिनीचा मोबदला कोणाला द्यायचा हा घोळ संपलेला नाही.

उजनी धरणाचे हिरज वितरिकेतून देगाव जलसेतू बांधून पाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतीसाठी जाणार आहे. यासाठी देगाव जलसेतूचे काम २००४ पासून सुरू आहे. सोलापूर-पुणे रेल्वेमार्गावरून देगाव बायपासजवळून हा देगाव जोडकालवा जातो. या जोडकालव्याची लांबी १८८६ मीटर इतकी आहे. यामधीलच रेल्वे रुळावरील ५५ मीटर व लगतच्या दोन्ही बाजूचे ४१ मीटर असे ९६ मीटर काम राहिले आहे. रेल्वे खात्याने काम करण्यास मंजुरी दिली असून, काम सुरू करण्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे पत्र दिले आहे. आता रेल्वे रुळावरील वितरिकेचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जलसेतूचे काम संपल्यानंतर कालव्याचे ४०० मीटरचे गट नंबर १२५ व १२६ शेतजमिनीवरील काम राहिले आहे. १२५ गट नंबरवर सरपंच ग्रामपंचायत देगाव (केशव भानुदास सुपाते) असे नाव असून, या १३ गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून लोक राहतात. हा परिसर हद्दवाढीत गेल्याने आता महानगरपालिकेचा ताबा आहे. ग्रामपंचायतही बरखास्त झाल्याने दप्तर महानगरपालिकेकडे आहे. उताºयावर ग्रामपंचायतीचे नाव व दप्तर महानगरपालिकेकडे असल्याने कृष्णा खोरे महामंडळाचे अधिकारी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करीत आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकारी व आयुक्तांसोबत चर्चाही झाली आहे. 

मात्र मार्ग निघाला नाही. ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या उताºयावरील अतिक्रमण कोणी काढायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, मोबदला कोणाला द्यायचा?, हाही प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे जलसेतूचे काम पूर्ण झाले तरी १३ गुंठे क्षेत्राचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पाणी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्याला जाणार नाही. विशेष म्हणजे कालव्याचे पुढचे कामही बºयापैकी झाले आहे.

जागा हस्तांतराचा झेडपी-मनपात वादच्हद्दवाढीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावे सोलापूर शहरात सामावली आहेत. ११ ग्रामपंचायती मनपात गेल्याने या गावातील आरोग्य विभाग, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत गावठाण तसेच अन्य शासकीय जागा हद्दवाढीत गेल्या. या जागा मनपाला हस्तांतरण करून देण्याचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. अशाच पद्धतीने देगावची १२५ गट नंबरचीजमीनही हस्तांतरण होऊन मनपाचे नाव नोंदणे आवश्यक आहे. च्जलसेतूचे काम झाल्यानंतर कालव्याद्वारे उत्तर तालुक्यातील २७९९ हेक्टर, दक्षिण तालुक्यातील ३८०० हेक्टर व अक्कलकोट तालुक्यातील ९०००  हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईrailwayरेल्वे