शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:57 IST2025-10-04T11:56:09+5:302025-10-04T11:57:06+5:30
या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
करमाळा : शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज (शनिवार) सकाळी हिवरवाडी शिवारात प्राणघातक हल्ला करण्यात आला. चिवटे हे आपल्या फार्महाऊसवरून स्कॉर्पिओ गाडीतून घरी येत असताना, एका व्यक्तीने मोटारसायकल आडवी लावून त्यांना अडवले.
“तु बागलाच्या विरोधात राजकारण का करतोस?” असे म्हणत संशयिताने काठी व हाताने चिवटे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीला पकडत पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू असून, पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत. हल्ल्यामुळे स्थानिक राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.