अट्टल गुन्हेगारास सोलापूरात अटक, मोटारसायकलीसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:56 IST2018-09-27T14:55:29+5:302018-09-27T14:56:37+5:30

अट्टल गुन्हेगारास सोलापूरात अटक, मोटारसायकलीसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : सोलापुरातील विविध ठिकाणी घरफोड्या करणाºया अट्टल चोरट्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. हरीश पोचप्पा जाधव (वय-३४ रा- सेटलमेंट साई कॉलनी नंबर-६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने व त्यांचे पथक सोलापुरात गस्त घालत असताना हरीश जाधव हा यश नगर येथे थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ हरीश जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 3 मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत. चौकशीमध्ये त्याच्याकडून दोन लाख एक हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हरीश जाधव याच्या विरोधात सोलापुरात १२ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.