पंढरपूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 13:20 IST2020-08-12T13:12:55+5:302020-08-12T13:20:14+5:30

भरधाव गाडी झाली पलटी; उपचारा दरम्यान झाला मृत्यू

Assistant Inspector of Police from Marathwada dies in Pandharpur accident | पंढरपूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू

पंढरपूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देसहा ते सात महिन्यांपूर्वीच ते शहर पोलीस ठाण्यात रुजू झाले होतेमनमिळावू स्वभावाचे असलेले क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खड्ड्यात पडून अपघात झाला

पंढरपूर : पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर (वय ३५) यांचा आज बुधवारी (ता. १२) पहाटेच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. पंढरपूरपासून जवळच असलेल्या कोर्टी गावाजवळ ही घटना घडली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर हे आज महूदकडून पंढरपूरकडे येत होते. या मार्गावर पहाटेच्या सुमारास भरधाव असलेल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खड्ड्यात पडून अपघात झाला. यामध्ये सपोनि राजेंद्र क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला.

सहा ते सात महिन्यांपूर्वीच ते शहर पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. मनमिळावू स्वभावाचे असलेले क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस कर्मचाºयांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Assistant Inspector of Police from Marathwada dies in Pandharpur accident